स्वराज्याचे स्वप्न प्रथमतः ज्यांनी पहिले आणि त्या स्वराज्यासाठी २ छत्रपती घडवले अश्या
"मासाहेब जिजाऊ"...
स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवून स्वराज्याची निर्मिती केली ते क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी राजे...
आणि अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी स्वराज्य वाढविले आणि रक्षिले असे शिवरौद्र शंभूराजे... यांना त्रिवार नमन...!!

नमस्कार मित्रांनो... आज माझे विचार मांडतोय ते परवा च्या शिवजयंती बद्दल...
परवाची शिवजयंती खूपच उत्साहात साजरी झाली... दिमाखदार म्हणतात ना अगदी तशीच...
मग त्यात लातूर मधल्या अडीच एकर जागेवरच्या भव्य दिव्य रांगोळी चे स्वरूप असो कि कोल्हापूर च्या छत्रपती शिवाजी मार्केट मध्ये लावलेले शिवरायांचे भव्य पोस्टर असो कि ठिकठिकाणी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम असो..
फारच उत्साहाच्या वातावरणात म्हणजे अगदी "जगात भारी १९ फेब्रुवारी" याला शोभेल असा दिवस साजरा केला..
पण इथं एक गोष्ट मनाला चटका लावून गेली.. ती म्हणजे गाडीवर भगवा झेंडा बांधून "ट्रिपल सीट" बसून कर्णकर्कश्य हॉर्न वाजवून गल्ली बोळातून गाड्या चालवणारी आजची तरुण म्हणजेच "सो कॉल्ड टेक सॅव्ही युवा पिढी".. ज्यांना त्या शिवजयंती पेक्षा आपल्या फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम वर ह्या "अश्या शिवभक्ती" चे व्हिडीओ टाकण्यात जास्त धन्यता वाटते...
रॅली जरूर काढावी त्यात कुठेतरी एकतेचा संदेश दडलेला असतो... आणि निश्चितच ह्या "कर्णकर्कश्य रॅली" काढणाऱ्या युवा पिढीच्या शिवभक्तीवर किंचितही संशय घेण्याचीही गरज नाही.. .खटकतं एवढंच कि उत्साहाच्या भरात त्यांचा मार्ग चुकतोय... लहान मुलांमध्ये चुकीचा संदेश जातो... शिवरायांनी केलेले अतुलनीय कार्य आणि त्यांनी घेतलेला स्वराज्य निर्मिती चा वसा हे अगदी अवर्णनीय असे आहे आणि खऱ्या अर्थाने शब्दाला शोभेल असे ते "रयतेचे राजे" होते, आहेत आणि अखंड राहतील.. म्हणूनच आजही ३०० वर्षानंतर देखील छत्रपती शिवराय आपल्या मनामनात आणि अगदी काळजातच भिनलेले आहेत असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार नाही...

म्हणूनच "आजच्या बाल आणि उद्याच्या तरुण पिढीसाठी" आपण काहीतरी सकारात्मक काम करून त्यांच्या पर्यंत शिवरायांचे विचार, त्यांची स्वराज्य निर्मिती ची अपरीमीत घोडदौड, त्यांचा रयतेबद्दल असणारा जिव्हाळा, त्यांचे कडक शासन, महिला वर्गाला आई-बहिणींप्रमाणे दिलेला आदर, गड किल्ल्यांचे संवर्धन, शिवरायांच्या स्वराज्याचा "इतिहास" आणि त्याच बरोबरीने परकीय आक्रमणांना पराजित करून निर्माण केलेला "स्वराज्याचा भूगोल" व अश्या इतर बऱ्याच गोष्टी पोहचवणे हि खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे.. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने "शिवरायांचे मावळे" निर्माण होतील.. कि ज्यांच्या बाह्य रुपाबरोबरच त्यांच्या वागणुकीतून शिवराय मनामनात पोचल्याची जाणिव नक्कीच होईल.. आणि म्हणूनच "शिवजयंती" साजरी करून झाल्यावर त्यांच्या शिकवणीचा, संस्कारांचा विसर न पडावा ह्या साठी मांडलेलं माझं प्रामाणिक मत..
अन्यथा परवा गाडीला बांधलेल्या झेंड्याची डायरेक्ट पुढच्या वर्षी - १८ फेब्रुवारी लाच शोधाशोध करावी लागणार.... एवढंच...!
- धन्यवाद
- विनय दिलीप मांडगे..
- विनय दिलीप मांडगे..

खूप छान विचार..🙏🏻😊
ReplyDelete