Friday, March 23, 2018

ध्येयाने झपाटलेला माणूस..

आज तुमच्यासमोर आणतोय, कहाणी एका ध्येय वेड्या माणसाची.... 

हि गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील, जळगाव जामोद तालुक्यातल्या काजेगाव मधील श्री. विजय वाघ यांची..!

विजय यांची काजेगाव मध्ये वडिलोपार्जित ८.५ एकर जमीन, ज्यातील बहुतांशी म्हणजे ७ एकर जिरायती आणि उर्वरित १.५ एकर बागायती जमीन.. 
वडील वीज कंपनीतून सेवानिवृत्त, भाऊ व्यवसायानिमित्त अमरावती ला स्थायिक.. व स्वतः विजय देखील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे येथे नोकरीस.. 
दोन्ही मुले बाहेरगावी असल्यामुळे पारंपरिक शेती पद्धतीने सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर अश्या पिकांच्या लागवडीवर वडिलांचा भर होता. पण यातून फारच जेमतेम उत्त्पन्न हाती येत असे.. 

ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून विजय यांनी निर्धार केला.. आणि हि स्थिती बदलायचं ठरवलं... 
पारंपरिक शेती करण्याबरोबरच त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायचं ठरवलं.. 
मग सुरु झाला तो अभ्यास.. बाजारपेठेचा पाठपुरावा करून त्यांनी शेती ला जोडधंदा विकसित करण्याची खूणगाठ मनाशी बांधली..

आणि हे सगळं सुरु करण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक होत.. ते उभं करण्यात त्यांना साथ दिली ती त्यांची खंबीर पत्नी सौ. योगिता यांनी.. त्याच बरोबरीने त्यांचे मित्र देखील यासाठी धावून आले... 

त्यांची पत्नी सौ. योगिता यांचे योगदान फार अमूल्य आहे.. विजय यांच्या संकल्पनेतील ऍग्रो फार्म सत्यात उतरवताना ज्या अडचणी आल्या त्यावेळी योगिता यांनी कायम त्यांचं मनोधैर्य खचू न देण्याची काळजी घेतली आणि हे शिवधनुष्य लिलया पेलण्यास विजय यांना बळ दिले.. 

झालं तर मग.. सर्वप्रथम त्यांनी शेळीपालन सुरु करायचं ठरवलं.. 
विजय हे नोकरी निमित्त पुण्यात असल्याने आपल काम "उंटावरून शेळ्या हाकणे" ह्या उक्तीस बळी पडू नये ह्यासाठी गावी व्यवस्थापन करण्यासाठी श्री. सिद्धार्थ यांची मदत घेतली.. व दैनंदिन कामासाठी २ कायम स्वरूपी मजुरांची नेमणूक केली.. 
घराजवळील क्षेत्रामध्ये त्यांना अभियंते असलेल्या मोठ्या बंधूंचे सहकार्य लाभले..  त्यांनी उपलब्ध साहित्याच्या मदतीने शेळीपालनासाठी बंदिस्त गोठा बांधला.. 
त्यानंतर विजय यांनी परिसरातील स्थानिक जातीच्या २० शेळ्यांपासून ह्या व्यवसायास सुरुवात केली.. हळूहळू व्यवस्थापन करून त्यांनी या क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं मार्गदर्शन घेऊन शेळ्यांची योग्य ती निगा राखली आणि पुढे जाऊन शेळ्यांची संख्या ७८  वर नेली... 
आजूबाजूचे गावकरी, व्यापारी यांनी गोठ्यात येऊन शेळ्यांची खरेदी करणे सुरु केले.. आणि पाहता पाहता गुणवत्तेनुसार शेळ्यांना ७५०० ते १२००० असा दर मिळू लागला...



शेळीपालनाबरोबरच त्यांनी गायी म्हशी पालन देखील सुरु केले.. हा जोडधंदा रोज चे ७० लिटर दूध आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रति लिटर ५० रुपये दराने विकले जाऊ लागले तसेच २ हजार प्रति किलो दराने तुपाची विक्री होऊ लागली..  
 गायी म्हशी च्या शेणापासून शेतीला पूरक अश्या शेणखताची निर्मिती झाली...



त्याचबरोबरीने सुरु केलेला आणखी एक जोडधंदा म्हणजे कडकनाथ कोंबडी पालन..
मध्यप्रदेशातून आणलेल्या २६ कोंबड्या व ३ कोंबडे यातून सुरु केलेला हा उद्योग आज ३०० कोंबड्यांवर येऊन पोहोचला आहे.. 
यातील २५% कोंबड्यांची विक्री करून पिल्लं व अंडी यांची ग्राहकांना थेट विक्री केली जाते.. व यातून देखील चांगला नफा उत्पन्न होतो..



याचबरोबरीने विजय यांनी ससेपालन देखील सुरु केले..  आणि आजच्या घडीला ३० ससे व १५ पिल्ले यांचा देखील व्यवसायात मोलाचा सहभाग आहे..!!



सुरुवातीला शेती व पूरक व्यवसायाच्या राखणीसाठी आणलेले श्वान देखील आज विजय यांच्या उत्पन्नात हातभार लावण्याचे काम करत आहेत.. 
विजय यांच्याकडे "रॉट वेलर", "जर्मन शेफर्ड" व "डॉबरमन" या जातीचे श्वान आहेत.. परिसरातील शेतकऱ्यांकडून श्वानाच्या पिल्लांची मागणी होऊ लागल्याने याचे हि संगोपन विजय यांनी सुरु केले आहे..



याच शेतीपूरक व्यवसायाला आता विजय यांनी आधुनिकतेची जोड देऊन अधिक सोयीस्कर केले आहे. या साठी त्यांनी CCTV कॅमेरे लावून सुरक्षितता व त्याच बरोबरीने ऍग्रो फार्म व्यवस्थापन काम सोपे केले आहे..
आज त्यांचे आई वडील घरबसल्या त्यांच्या फार्म मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष देतात..

आज विजय यांच्या या अत्याधुनिक "ऍग्रो फार्म" पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कॉलेजेस, कृषी विज्ञान केंद्र, सेवा संस्था.. आवर्जून भेट देतात...
त्यांनी केलेले ऍग्रो फार्म चे व्यवस्थापन, आज महाविद्यालये व परिसरात एक आदर्श उदाहरण निर्माण झालेले आहे....

अश्या आजच्या तरुण पिढी साठी आदर्श ठरणाऱ्या आणि "शेतीत आता काही दम नाही" अश्या नुसत्या पोकळ गप्पा मारणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी श्री. विजय वाघ हे आज खऱ्या अर्थाने "ऍग्रो हिरो" ठरत आहेत..! 

त्यांच्या ह्या कार्यास भरभरून शुभेच्छा..!!

Tuesday, March 13, 2018

खांबाला कुठेतरी तडे जातायेत..


मागच्या आठवड्यात सगळ्यांची आवडती "चांदणी" अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुःखद निधन झालं..
आणि ठीक त्याच दिवशी भारत - पाक सीमेवर पाकिस्तान ने शस्त्रसंधी चे उल्लंघन करून भ्याड गोळीबार केला आणि त्यात आपले २ वीर जवान हुतात्मा झाले..

सगळ्यांची आवडती म्हणण्यामागचं कारण एवढंच कि आठवडा उलटल्यानंतर सुद्धा श्रीदेवी च्या मृत्यू च्या चर्चा अजून हि कायम आहेत.. आणि प्रत्येक जण यात काहींनाकाही योगदान देतोय...
आणि याच श्रेय जात ते आपल्या "लोकशाही चा चौथा खांब - प्रसार माध्यमं" यांना..
श्रीदेवी च्या मृत्यूच्या दुःखद घटनेचं प्रसार माध्यमांनी जे "सोहळ्यात" रूपांतर केलं त्याला खरंच काही तोडच नाही...

मग त्यात वेळो वेळी येणारी ब्रेकिंग न्यूज..
म्हणजे बोनी कपूर ने केलेला सरप्राईज डिनर प्लॅन..
त्यात अचानक झालेला, रहस्यमय असा श्रीदेवी चा मृत्यू..
नंतर आलेला पोस्टमार्टम रिपोर्ट..
आणि मग परत मृत्यू नेमका कसा झाला...? श्रीदेवी ला कोणी मारलं..? असे असंख्य प्रश्न
बोनी कपूर ची दुबई मध्ये होणारी चौकशी..
मुलीच्या चित्रपट प्रदर्शना आधीच घडलेला योगायोग..
अर्जुन कपूर चे डोळे हि "सावत्र आई" साठी पाणावले..
श्रीदेवी च पार्थिव दुबई वरून कधी येणार..
त्यासाठी अंबानींनी केलेली स्पेशल प्लेन ची व्यवस्था..
आणि अखेर पार्थिव विमानतळावर दाखल...
त्यात मग सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी श्रीदेवी च्या पार्थिवाला "बॉडी" म्हणल्याने केलेला ट्विटर वार...
अनिल कपूर विमानतळावर पोहोचले..
त्यानंतर ऍम्ब्युलन्स चा पाठलाग करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्या....
सरते शेवटी पार्थिव घरी पोहोचले...
त्यानंतर सेलेब्रेटींची अंत्य दर्शनासाठी लागलेली रीघ...
मग सरकारी इतमामात होणार श्रीदेवी वर अंत्य संस्कार..
हे झाल्यावर असं वाटलं आता हे कुठं तरी थांबलं पाहिजे.. आणि थांबेल अशी अपेक्षा होती..
पण नाही... पुन्हा एक दिवस सगळ्या ठळक घटनांचा मागोवा घ्यायला आपले प्रसारमाध्यमं सरसावले नसते तर नवलच..

आपल्या ह्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाने मग "श्रीदेवीच्या रहस्यमय रोमांचक १० घटना" ह्या मथळ्याखाली पुन्हा २ दिवस त्याची पारायणं सुरु केली...
खरंच हे पाहून मन अस्वस्थ होत होतं ..
त्यावेळी अशी जाणीव झाली कि राज्यासमोर, देशासमोर आणि जगासमोर भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे "श्रीदेवी"..
मग त्या घटनेने सगळं काही मागे पडलं..
सीमेवर होणार गोळीबार.. त्यात शहीद होणारे, मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करणारे - वीर सुपुत्र..
करोडो रुपयांचे झोल करून देशाबाहेर जाणारे "घोटाळेबाज"
आणि काही हजारांचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करणारा आमचा अन्नदाता, गरीब शेतकरी "राजा"
मग त्यावेळी घरातला कर्ता पुरुष गमावल्यावर काळाचा आघात झेलणारे त्याचे कुटुंबीय..
सगळं, सगळं काही शून्य होतं ह्यापुढे...

ह्या दुःखद घटनेचे इतके लेटेस्ट अपडेट देऊन "सोहळ्यात" रूपांतर करण्याची गरज होती का.. ?
त्या ४ दिवसात खरंच बाकी काहीच महत्वाचं न्हवत.. ?
शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा, सीमेवर होणारा गोळीबार, बँकामध्ये होणारे कोट्यवधींचे घोटाळे ह्या सगळ्यांपेक्षा "ह्या" ब्रेकिंग न्यूज अति महत्वाच्या होत्या का.. ?
खरंच सैनीकांच्या शहादत, अन्नदात्या शेतकऱ्याच्या आत्महत्त्या पेक्षा सेलिब्रेटी च मरणं इतकं महत्वाचं असावं... ?
शेवटी TRP च्या रस्सीखेचात आणि आपल्या बिजनेस च्या ग्रोथ मध्ये कशाला किती महत्व द्यावं हे हि समजू नये. ?
असे आणि अश्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनात वादळ निर्माण झालं..
म्हणूनच अस वाटतंय कि "खांबाला कुठेतरी तडे जातायेत".. 

Monday, March 5, 2018

मेरी प्यारी "धकधक"

जब भी देखता था तुझे 
तो में मन हि मन मुस्कुराता था... 

तेरी धडकन सूनके हि तो
मेरा दिल भी धडकता था...

ना जाने कितने अरमान
दिल में लियें चलतां था..

जरूर कुछ तो बात हे तुज मे
जो मेरी निंद खो गई...

हमने दिल से दुवा मांगी  
और दुवा कबुल हो गई...!!




#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...