अनुभवी
लोकांसाठी तसा नित्याचा, पण
माझ्यासाठी प्रसंग तसा "बाका" (कठीण) च
नुकताच
कॉलेज मधून पासआऊट झालेलो..
आणि अपेक्षे प्रमाणे, किंवा त्याहूनही अधिक चांगल्या MNC कंपनीत
नोकरी मिळाल्याने….
"आज में उपर..
आसमाँ नीचे, आज में आगे...
जमाना हे पीछे" या
गाण्याला शोभेल असंच काहीतरी अनुभवत होतो..
ऑफिस
मधला तो झगमगाट.. ते
सगळ्यांचं पॉश राहणीमान हे
सर्व पाहून भारावून तर गेलेलोच पण
अश्या ठिकाणी काम करण्याची एक
धास्ती देखील होती..
पण त्यातच ५ दिवसांचा आठवडा
म्हणल्यावर मग धास्ती सुद्धा
५ दिवसांचीच... कारण नंतर २
दिवस आपण आपल्या मनाचा
राजा होतो..
ऑफिस
मध्ये सुरुवातीला दिसणारे अनोळखी चेहरे.. त्यांचा कामावर येतानाचा अति-उत्साह.. आणि
नंतर तासाभराने (अर्थातच काम सुरु झाल्यावर)
होणारा तो चेहऱ्याचा कायापालट
म्हणजे जणू "हेमा मालिनी" च
"निरुपा रॉय" मध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशनच, आणि हे पाहताना सुरुवातीला फारच गम्मत वाटायची...
सगळं
काही एकदम स्वप्नवत असंच
होतं.. अगदी चित्रपटात दाखवतात
ना तसंच..
चहा,
कॉफी चे ते भारीतले
मग हातात घेऊन, सकाळ सकाळी हेडलाईन्स
वर चर्चा करणारे आणि नंतर मिटिंग
साठी लगबगीने तयारी करणारे सहकारी..
कधीही
वाट्टेल तेव्हा चहा/कॉफी घेऊ
शकतो ह्या कल्पनेनेच चहाची
तलभ निर्माण व्हायला लागली.
(आणि ८ वर्षे झाली तरी आजतागायत ती कायम आहे)
दरवाज्यातून
आत बाहेर करताना होणारं बायोमेट्रिक पंचिंग...
तेव्हा
मला कळालं कि कुठेही जा,
कितीही शिका.. आपल्याला अंगठ्याशिवाय काही पर्याय नाही..
हे सगळं झाल्यावर मग
टीम ची ओळख करून
देण्यात आली.. आणि त्यांनीच मला
माझी "जागा" दाखवली..
तिथे
आधीच असणारा कॉम्पुटर पाहिल्यावर, न राहवून मी
विचारलंच.. कि इथे कोणी
दुसरी व्यक्ती बसते का.? त्यावर
उत्तर आले कि नाही
ती जागा माझ्यासाठीच आहे
आणि तो कॉम्पुटर देखील
माझ्यासाठीच तिथे मी येण्याअगोदर
सेट केला आहे...
हे ऐकल्यावर तर डोळ्यात पाणीच
यायचं राहील होतं.. माझी इतकी "काळजी"
घेणारे लोक पाहून तर
मी कृतकृत्य झाल्याची भावना मनात आली..
नंतर
कॉम्पुटर चा पासवर्ड लिहिलेली
स्टिकी नोट हाताशी घेऊन,
पहिल्यांदा लॉगिन करून लगेच (त्या
नवीन कोऱ्या मशीन चा) पासवर्ड
बदलून टाकला..
(जणू
त्या मशीन मध्ये खूप
काहीतरी Confidential माहिती होती)
असो
तशी खबरदारी घ्यायची सूचनाच Induction मध्ये दिली असल्याने पासवर्ड
बदलल्यावर लगेचच मी स्वतःची पाठ
थोपटून घेतली..
टीम
मधल्या सहकाऱ्यांनी मग आमचे व्यवस्थापक
(Manager) यांच्या ऑफिस ची सफर ते आत नसताना घडविली.
आणि
मग मला "थोड्यावेळाने जाऊन आपण त्यांना
भेटून येऊ" असं सांगितलं..
झालं
तर मग.! त्या वेळापासून
माझी धडधड मला स्पष्ट
ऐकू येऊ लागली.. लगेचच
१० मिनिटात आम्ही त्यांच्या ऑफिस कडे जायला
निघालो..
आम्ही
टीम मध्ये एकूण ४ जण..
त्यातले १ जण सुट्टीवर
मग राहिलेले आम्ही तिघे तो गड
सर करत चाललो होतो..
त्यात
माझ्या मनात नाना विचार.
कि कसे असतील हे
मॅनेजर.. कडक असतील का..?
परत काही Interview घेतील का ? नेमकं आज
पहिल्या दिवशी काय बोलतील ?
अश्या
आणि अनेक प्रश्नांनी माझ्या
मनात प्रश्नांचं वारूळ निर्माण झालं होतं...
तोवर
आम्ही त्यांच्या ऑफिस च्या दरवाज्याशी
पोहचलो..
आम्हाला
तिघांना पाहून त्यांनी एक "मनभरून स्मितहास्य" केलं आणि आम्हाला
आत बोलावलं...
कोणी
काही बोलायच्या आत त्यांनी "Good Morning Vinay. Welcome to
our team. We were waiting for you since yesterday." असं म्हणून मला
एक सुखद धक्काच दिला...
आणि
नंतर खूप आपुलकीने माझ्याशी
एक १०-१५ मिनिट
निवांत गप्पाच मारल्या.. अगदी मित्राप्रमाणे...
त्यांच्या
त्या बोलण्याने माझ्या मनातल्या सगळ्या शंका-कुशंका, भीती,
दडपण एका क्षणात निघून
गेलं.. आणि मन एकदम
साफ झालं, अगदी त्या टाईड
च्या जाहिरातीतल्या शुभ्र पट्ट्यासारखं...
दूसरा
दिवस उजाडला... खूप उत्साहात म्हणजे
मघाशी म्हणल्याप्रमाणे अगदी उत्साहातच मी
सुद्धा ऑफिस ला पोहचलो..
चहा,
नाश्ता आटोपला आणि थोड्याच वेळात
म्हणजे शार्प १० वाजता.. मला
आमच्या व्यवस्थापक (Manager) सरांचा पिंग (Message) आला -
Hi Vinay
Good Morning
यावर
मी सुद्धा अगदी आनंदाने त्यांना
ग्रीट केलं -
Very Good Morning Sir ...!!
त्यानंतर
पुढचा मेसेज आला..
Stand-up
मी देखील लगेच "Okay" रिप्लाय देऊन, जागेवर ताड्कन उभा राहिलो...
आणि
आजूबाजूला पाहून विचार करू लागलो कि
सरांनी मला का बरं
उभं राहायला सांगितलं असेल..
मग लक्ष्य गेलं कि माझ्या
डोक्यावरच थोडस बाजूला एक
कॅमेरा होता.. आणि मग वाटलं
कि नक्कीच सर यातून मला
बघत असतील...
आणि
पुढे काहीतरी सूचना देतील..
२ मिनिट झाले मी तसाच
स्थब्ध उभा होतो...
बोलताना
या आधी आणि नंतर
हि खूप सहज बोलून
जातो २ मिनिट थांब
रे. पण ती घड्याळाची
२ मिनिटं मी त्या क्षणाला
पूर्णतः अनुभवत होतो..
पुढच्या
सूचनांची वाट पाहत.. कॅमेऱ्याकडे
नजर फिरवत.. आजूबाजूला कोणी येऊन काहीतरी
सूचना देईल ह्या अपेक्षेने...
अश्या
२ मिनिटांच्या स्तब्धतेनंतर टीम मधील माझे
एक सहकारी, व्यवस्थापकांच्या ऑफिस मधून डोकावले
आणि त्यांनी आवाज देऊन मला
बोलावून घेतले...
मग त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यावर
मी घडलेला किस्सा सांगितलं कि मी त्यांच्या
पुढच्या सुचनेसाठी वाट पाहत, "Stand Up" सांगितल्याप्रमाणे उभा होतो...
त्या
नंतर सर्व जण जे
हसण्यात गुंग झाले कि,
पुढची दहा मिनिटं मला
काही सुधरतच न्हवतं..
मग त्यांनी मला समजावून सांगितले
कि
"Stand-Up" म्हणजे
दररोज होणारी मिटिंग ज्यात आपण काय काम
करतो आहोत ह्या बद्दल
ची माहिती टीम मध्ये सांगतो.
आणि
हे ऐकल्यावर मग मला कळेनाच कि हसू कि
रडू.. काहीच समजत न्हवतं...
ती घड्याळाची १२० सेकंद मी
जे उभं राहून, कॅमेऱ्यात
पाहून पुढच्या सूचनेची वाट पाहत होतो
हे आठवून माझं मलाच हसू आवरत
न्हवतं..
अश्या
ह्या गमतीदार “Stand-up” चा किस्सा आजही
आठवला कि चेहऱ्यावर हसू
आल्या शिवाय रहात नाही..!
वरील घटना पूर्णपने "वास्तविक" असून याचा "काल्पनिक" गोष्टींशी तिळमात्र संबंध नाही...
असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... :)
धन्यवाद..